REVIEWS
- Home
- REVIEWS
दिव्या नांदवीकार
विद्यार्थी
मंगला घाईतडके
विद्यार्थी
माझ्या दोन्ही मुली नमिता व तेजश्री विशारद लेवल पर्यंत पोहोचण्यासाठी फक्त आणि फक्त हेमांगी ताई आणि सुर संस्कार चा खूप मोठा हात आहे.
माझी छोटी मुलगी तेजश्री जेव्हा तिच्या आजीबरोबर पहिल्यांदा सुर संस्कारमध्ये हेमांगी ताईंना भेटायला गेल्या तेव्हा मला आल्या आल्या माझ्या सासु बाईंनी जी खात्री पूर्वक मला हमी दिली की आपल्या मुली एका चांगल्या संगीत शिक्षिकेच्या हाती सोपवित आहोत आणि माझ्या मते हीच एक महत्वाची पावती प्रत्येक पालकांना हवी असते.
सुर संस्कार हे नुसती संगीताची अकॅडमी नसून हे संगीताचे एक विद्यापीठ आहे. एक आदर्श शिक्षक कसा असावा याचे मुर्तीमंत स्वरूप म्हणजे हेमांगी मॅडम त्यांची शिकविण्याची शैली निराळीच, कधी कोणाला असे वाटतच नाही की क्लासमध्ये आपण आहोत. खेळीमेळीच्या वातावरणात त्यांच ते शिकविणे म्हणजे मुलांसाठी एक मेजवानीच असते.
त्यांच्यासाठी संगीत शिकविणे हा कधीही पेशा नव्हता तर ते त्यांच्या जीवनाचे एक ध्येय होते. महत्त्वाचे हे की संगीत शिकविताना कधीही त्यांनी कुठलाही प्रकारचा भेदभाव वा दुजाभाव ठेवला नाही आपल्या कडे जे आहेते भरभरून आपल्या मुलांना देणे हा भाव त्याच्यांत मला नेहमीच दिसला.
जशी आई आपल्या मुलांवर प्रेम करते तसे हेमांगी मॅडम आपल्या विद्यार्थ्यांवर प्रेम करतात.
माझे विद्यार्थी हे कसे आदर्श विद्यार्थी बनतील हात्यांचा अहोरात्र प्रयत्न असतो.कुठलाही राग शिकविताना तो नुसता अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी नसून तो, माझ्या मुलांच्या मनात कसा रूजवता येईल, त्याला अनुसरून त्यांची शिकविण्याची पध्दत आहे आणि त्यामुळेच त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या
मनात संगीताबद्दल एक सकारात्मक दृष्टीकोन जागरूक करण्याचे कौशल्य त्यांच्यात आहे ते सांगितीक संस्कार त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांवर केलेत .
विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी गुरूची बरोबरी कधीच करू शकत नाही . तसे आपल्याला सर्व गुरू
आदरणीय असतात पण काहीच आपले आदर्श बनू शकतात ,त्याच्याबद्दल च्या आठवणी आणि त्यांनी रूजू घातलेल्या संस्कारांची ठेवण आजन्म आपल्या सोबत असते.याचे उदाहरण म्हणजे हेमांगी
मॅडम ...
शेवटी एवढच म्हणीन की “शिक्षक विद्यार्थी निष्ठ असावा,
विद्यार्थी ज्ञान निष्ठ असावा,
ज्ञान समाज निष्ठ असावे
आणि
समाज समता निष्ठ असावा “ हेमांगी मॅडम विद्यार्थी निष्ठ आहेत म्हणूनच त्यां माझ्या दोनही मुली नमिता आणि तेजश्री या कळ्यांच फुलांत रूपांतर करू शकल्या ...
त्यांच्या सहवासातून, संवादातून, आचरणातून, चारित्र्यातून संगीताची श्रीमंती असलेला कर्तबगार विद्यार्थी घडविण्याचे उल्लेखनीय कार्य त्या एक दशक करत आहेत . त्यांच्या या कार्याला मनापासून सलाम ...
सौ. राजश्री तांबे
पालक
गेले ८ वर्ष मी सूर संस्कार अकॅडमी ऑफ म्युझिक मध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, हेमांगी मॅडम च्या गायडन्स मध्ये शिकतोय. ८ वर्षामध्ये त्यांच्याकडून आम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. मॅडमची शिकविण्याची पद्धत खूपच यूनिक आहे. अगदी आई जशी आपल्या लहान बाळाला शिकविण्याचा प्रयत्न करते त्याचप्रकारे हेमांगी मॅडम सुद्धा प्रत्येक राग व त्याची माहिती किंवा एखादे गाणे सुद्धा त्याच प्रकारे शिकवितात. हेमांगी मॅडम हार्मोनियम वा गिटार हे इंस्ट्रूमेन्ट सुद्धा शिकवतात. ते ही अगदी एखाद्याला सहज समजेल अश्या पद्धतीने मी सूर संस्कार मध्ये शास्त्रीय संगीत बरोबर कीबोर्ड, हार्मोनियम आणि तबला हे इंस्टूमेन्ट सुद्धा शिकलो. प्रत्येक गुरू आपल्या विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या क्वॉलिटी शोधण्याचा प्रयत्न करत असतो त्याचप्रकारे मॅडमनी मला लहान मुलांना गाणी, तबला, हार्मोनियम शिकविण्याची संधी दिली आणि त्यांना माझी शिकविण्याची पद्धत आवडली. तसेच छोट्या - मोठ्या कार्यक्रमात मला हार्मोनियम, किबोर्ड किंवा तबला वाजविण्याची संधी हेमांगी मॅडमी मुळे मिळाली त्यामुळे मी त्यांचा खूपच ऋणी आहे. शीतल सर प्रत्येक वर्षी सूर संस्कार क्लास चा म्युझिकल प्रोग्राम आयोजित करतात त्यात क्लास चे सर्व विद्यार्थी सहभागी होतात आणि आपली कला सादर करतात. शीतल सरांमुळे आम्हा सर्व विद्यार्थ्यांना स्टेज परफॉर्मन्स देण्याची संधी लाभते.
शीतल सरांनी माझ्यातला टॅलेन्ट बघून मला त्यांच्या सेवेन ट्वेन्टी टेन नेटवर्क या कंपनीमध्ये जॉब ची संधी दिली. बिगीनर म्हणून मी तिथे जॉब सुरू केला आणि कंपनीमध्ये मला खूप काही शिकण्याची संधी मिळाली ती शीतल सरांमुळे. मी ३ वर्ष ग्राफीक डिझायनर आणि विडीओ एडीटर २ डी ॲनीमेटर पदावर काम करतोय. हेमांगी मॅडमच्या गायडन्स साठी मनापासून धन्यवाद! आणि शीतल सरांचे सुद्धा मनापासून आभार, मला जॉब ची संधी दिल्या बद्दल.
गौरव थवी
विध्यार्थी
संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. भारतीय शास्त्राप्रमाणे जीवनातील प्रत्येक कृती संस्कारयुक्त असली पाहिजे.
तेज स्पर्शाने दूर होई अंधार
जैसा मुळांचा वृक्षास असे आधार
शिल्पास आकारी जसा शिल्पकार
मना घडवी संस्कार
अशीच ही आमची सूर संस्कार अकॅडमी ऑफ म्युझीक गेल्या ११ वर्षापासून, आम्हा सर्व विद्यार्थ्यांचे संगीत विकसित व सुखी करण्याकरिता विविध साधने उपलब्ध करून देत आहे. ह्या अकॅडमी चे संचालक श्री. शीतल पाकणीकर आणि सौ. हेमांगी पाकणीकर उत्कृष्ट पद्धतीने, सर्वांना समाविष्ट करून प्रगतीच्या मार्गावर नेत आहेत. सर्वांवर सुरांचे संस्कार घडवून आणत आहेत. आमच्या गुरू सौ. हेमांगी पाकणीकर, ह्यांच्यामुळे आम्ही सर्व संगीताशी (सुरांशी) एकरूप झालो. मी गेली दहा वर्षे ह्यांच्या मार्गदर्शनात संगीत शिक्षण घेत आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांना संयम व आदराने, प्रत्येक विषय पूर्णपणे समजेपर्यंत प्रयत्न करतात, व आम्हाला कुठल्याही क्षणी शंका / अडथळा आल्यास उपयुक्त मदत करतात. अशीच त्यांची छत्रछाया आम्हा सर्वांवर असू दे, अशीच कायम आमची इच्छा आणि देवाचरणी प्रार्थना.
सौ. हेमांगी पाकणीकर ह्यांचे संगीत ज्ञान आणि हे जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा आणि श्री. शीतल पाकणीकर ह्यांची मेहनत आणि ह्यांचे समर्थन, सूर संस्कार अकॅडमी ऑफ म्युझिक ला प्रगतीच्या शिखरापर्यंत नेत आहे. आणि ह्या प्रक्रियेस आम्ही सर्व विद्यार्थी कायम आमचे योगदान देण्यास उत्सुक आहोत.
दिव्या हट्टंगडी
विद्यार्थी
I joined Sur Sanskaar Academy in 2013 for light music. It was a wonderful experience learning from Hemangi mam. Hemangi mam has an amazing style of teaching. I am currently learning Hindustani classical music from her. With the vast knowledge that she selflessly shares with us I enjoy the process of learning to the fullest. My elder son Abhishek has successfully completed three levels of Akhil Bhartiya Gandharva Mahavidyalaya exams under the guidance of Hemangi mam. He took Hindustani Classical music for his tenth grade ICSE and learnt the syllabus from Hemangi mam and cleared with flying colors. My younger son Ishaan too, is learning Hindustani classical music at the Academy under the guidance of Divya teacher. Divya teacher is also very supportive and takes special efforts with younger students. Sur Sanskaar Academy has played an important role in improving our passion and knowledge in Hindustani Classical music.
Neha Pai
Parent / STudent
आर्या साधारण सव्वापाच वर्षांची असताना मी तिला सूर संस्कार अकॅडमीमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेऊन गेले होते. तेव्हा हेमांगी टीचरनी प्रवेश देण्यापूर्वी तिची छोटीशी टेस्ट घेतली होती. त्यावेळी आर्याने त्यावेळी आर्याने त्यांना एक कविता म्हणून दाखवली होती. ती ऐकून टीचर म्हणाल्या होत्या की हिला गायनात गती आहे. सुरू करूया आपण क्लास. अशा त-हेने आर्याच्या आयुष्यातल्या शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली.
हेमांगी टीचर मुळात खूप प्रेमळ आणि मृदू भाषी असल्याने आर्या चटकन, क्लासमध्ये खुलली. त्या खूप पेशन्सने, मुलांच्या कलाने घेऊन शिकवतात. विद्यार्थ्यांवर कधीच चिडत नाहीत. त्यामुळे आर्यामध्ये शास्त्रीय संगीताची गोडी निर्माण झाली आणि तिला ते वर्षागणिक अधिकाअधिक आवडू लागल. क्लास जॉईन केला तेव्हा आर्या खूप लहान असल्याने तिला हिंदीमध्ये बंदिशी लिहिता वाचता येत नसत. यावर हेमांगी टीचरनी रामबाण उपाय शोधला. त्या बंदिशीच व्हीडीओ रेकॉर्डीग करून देत असत. त्यामुळे घरी रियाज, सराव करताना जणू काही टीचरच समोर बसून गात आणि शिकवत आहेत असा फील तिला येत असे. त्यामुळे कोणताही राग अथवा बंदिश झटकून आत्मसात होऊ लागली. तसच कळत नकळत हेमांगी टीचर सारखेच स्वर लगाव घ्यायची तिला सवय लागली. याच सर्व श्रेय हेमांगी टीचरलाच जातं.
हेमांगी टीचर खूप हेल्पींग नेचर च्या आहेत. कधीही कुठलीही शंका आली की आर्या वेळ काळ न पाहता त्यांना बिनधास्त फोन करते आणि शंका निरसन करून घेते. गुरूविषयी विद्यार्थ्यांना इतका विश्वास आणि आपलेपणा वाटण यातच सर्व काही येतं. आर्याने आतापर्यंत गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांमध्ये जे घवघवीत यश मिळवलय त्याचं श्रेय हेमांगी टीरचलाच जातं.
__ करोना काळात, पँडामीक मध्ये सतत घरात बसावे लागले. तरी आर्याला याचा कधीच कंटाळा आला नाही याचे कारण म्हणजे शास्त्रीय संगिताची गोडी हेच आहे. या काळात जास्तीत जास्त शास्त्रीय संगीत ऐकून तिने तो वेळ सत्कारणी लावला. अर्थात All Credit Goes to Hemangi Ma'am प्रत्येक वर्षी सूर-संस्कार अकॅडमी तर्फे वर्षभरात आपण काय शिकलो, यांच्या प्रगती मापनासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा सांगितिक कार्यक्रमामधून मूलांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जातो त्यामुळे मुलांना स्टेज डेरींग ही येतं. तसच अकॅडमी तर्फे अनेकदा मुलांना आकाशवाणीवरही नेल जातं. त्यामुळे मुलांना लाईव रेकॉर्डीग चाही अनुभव मिळतो.
अशा अनेक उपक्रमांतून सूर संस्कार अकॅडमी मुलांना वेगवेगळी दालनं खुली करून देते.
हेमांगी टीचर ICSE students ना music विषय घ्यायचा असेल तर अभ्यासक्रम शिकवून... Syllabus तीन टर्म्स मधे विभागून पेपर सेट करून खुप मोलाची मदत करतात... त्यामुळे शाळेत music विषयाला शिक्षक नसतील तरी मुलं music हा विषय ( electives म्हणून ) घेऊ शकतात.
आम्ही सर्व पालक आणि विद्यार्थी, हेमांगी टीचर, शीतल सर आणि सूर संस्कार अकॅडमी चे आजन्म ऋणी राहू. भावी पिढीमध्ये संगीताची रूची निर्माण करण्याचे महान कार्य असेच निरंतर चालू राहो, अशा सदिच्छा देऊन माझे मनोगत इथेच थांबवते.
आम्ही सर्व पालक आणि विद्यार्थी, हेमांगी टीचर, शीतल सर आणि सूर संस्कार अकॅडमी चे आजन्म ऋणी राहू. भावी पिढीमध्ये संगीताची रूची निर्माण करण्याचे महान कार्य असेच निरंतर चालू राहो, अशा सदिच्छा देऊन माझे मनोगत इथेच थांबवते.
प्रिती मोघे
पालक