पाठ्यक्रम

अ. भा. ग. महाविद्यालयीन या पाठ्यक्रमाअंतर्गत प्रारंभिक ते विशारद ह्या ८ ते ९ वर्षाच्या प्रवासात विविध रागांवर आधारित लक्षण गीते, सरगम गीते, बंदिशी, धृपद, धमार, बडा खयाल, तराणे इत्यादी चे ज्ञान प्राप्त होते.

या अभ्यासक्रमाअंतर्गत विविध रागांवर आधारित नाट्यसंगीत, ठुमरी / दादरा यांचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होते. सादरीकरणातील विविध पैलू शिकता येतात व योग्य मार्गदर्शन मिळते.

 

या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी बरीच लोकप्रिय व अजरामर गीते सहजतेने गाऊ शकतात. यात भावगीते, भक्तिगीते, अभंग इत्यादी चा समावेश आहे.

 

७ ते १२ वर्षातील वयोगटातील बालकांसाठी खास पाठ्यक्रम. यात सहजतेने गाऊ शकतील अवडती व मनोरंजात्मक बालगीते शिकवली जातील. यात प्रार्थना, देशभक्तीवर गीते, भक्तिगीते, पाऊसगाणी व इत्यादीचा समावेश आहे.

या पाठ्यक्रमा अंतर्गत विद्यार्थी आकलन क्षमतेनुसार ठराविक रागांवर आधारित सुलभ ते कठीण गीतांचा अभ्यास करता येईल. यात, चित्रपट गीते, भजन/अभंग व गझल इत्यादींचा समावेश.

 

आय. सी. एस. इ. च्या विविध शाळांमध्ये ९वी ते १०वी च्या अभ्यासक्रमात शास्त्रीय संगीत हा एक निवडक विषय आहे. यातील पूर्ण अभ्यासक्रमाची तयारी करून जास्तीत जास्त गुण मिळविण्या साठी हा पाठयक्रम आहे.

मुंबई विद्यापीठातील अभ्यासक्रम सहजतेने शिकण्यासाठी विशेष मार्गदर्शन व तयारी करून घेतली जाते.

 

 

भारतीय शास्त्रीय गायन हे ध्वनि प्रधान आहे. शास्त्रीय संगीतात उत्तर हिंदुस्तानी आणि कर्नाटकी अशा दोन प्रमुख शैली अस्तित्त्वात आहेत. त्याचप्रमाणे शास्त्रीय गायनातही या दोन शैली आहेत.

 

अ. भा. ग. महाविद्यालयीन या पाठ्यक्रमाअंतर्गत प्रारंभिक ते विशारद ह्या ८वी ते ९वी वर्षाच्या प्रवासात विविध रागांवर आधारित लक्षण गीते, सरगम गीते, बंदिशी, धृपद, धमार, बडा खयाल, तराणे इत्यादी हार्मोनियम वर वाजविण्याचे ज्ञान प्राप्त होते.

चला अभ्यास करू

संगीत शिकण्याचे बरेच फायदे आहेत - मग ते तुमचा आत्मविश्वास वाढवणारे असोत, तुमची स्मरणशक्ती वाढवत असोत किंवा तुमचे सामाजिक वर्तुळ रुंदावत असोत.

तुम्ही संगीत शिकण्याचे विचार करावे अशी पाच कारणे

मोफत पाठासाठी वेळ ठरवा