आमच्या बद्दल

भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेचा वारसा पुढे नेणाऱ्या सूर संस्कारांच्या संस्थापिका सौ हेमांगी पाकणीकर

संगीत एक नादमय विचार करण्याची कला

सूर संस्कार म्हणजेच भारतीय शास्त्रीय व सुगम संगीत परंपरेचा उत्सव...

सूर संस्कार अकॅडेमी हे एक स्वयंचलित, सामाजिक व कौशल्य विकसन घडवणारी, सेव्हन ट्वेंटी टेन (ग्लोबल मीडिया, स्पोर्ट्स, आय. एम. सी. कन्सल्टिंग नेटवर्क ऑर्गनायझेशन ) पुरस्कारित मुंबई उपनगरातील संस्था आहे

सूर संस्कार अकॅडमीचा हा भारतीय संगीत संस्कृती व परंपरा जतन करण्याचा व पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. जुलै, २०१० मध्ये सुरू झालेल्या या संस्थेत, संगीताची मूलभूत तत्वे व संस्कृती याचा पुरस्कार केला जातो. ७ ते ७० वयोगटासाठी, आखलेल्या विविध अभ्यासक्रमाअंतर्गत आजवरच्या वाटचालीत ९०० हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आजवर बऱ्याच विद्यार्थ्यांची व श्रोतृवर्गाची विश्वासार्हता, निष्ठा व प्रेम आम्ही संपादित केले आहे.

वैयक्तिक लक्ष देण्याच्या उद्देशाने, एका वर्गात जास्तीत जास्त ५ विद्यार्थ्यांचा समावेश असतो.

गेल्या दहा वर्षात बऱ्याच निष्ठावंत पालकांकडून विद्यार्थ्यांमध्ये संगीताची आवड निर्माण झाल्याचे प्रामाणिक अभिप्राय हे आजवरच्या मेहनती वाटचालीची साक्ष देतात.

ह्या संस्थेला आजवर सहकार्य करीत आलेले परिवारतील आदरणीय व महत्वाचे सदस्य

पंडीत श्री. रघुनाथ फडके

डॉ. प्रकाश पाकणीकर

प्रो. डॉ. एस के पाकणीकर

श्री. राकेश कौशिक

सौ. मीना नागराजन

सौ. तेजश्री सुखटणकर

कै. माधव शेवडे

सौ. मोहिनी टिल्लू

पंडीत श्री.आनंद काशीकर

डॉ. शीला पाकणीकर

श्री सुभाष गंधे

सौ. अल्का खातू - गुजर

डॉ. शिला पाकणीकर

सौ. शैलजा नाखरे

सौ. शैलजा दिक्षित

श्री. संजय शेवडे

सूर संस्कार म्हणजेच भारतीय शास्त्रीय व सुगम संगीत परंपरेचा उत्सव

सूर संस्कार अकॅडमीचा हा भारतीय संगीत संस्कृती व परंपरा जतन करण्याचा व पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. जुलै, २०१० मध्ये सुरू झालेल्या या संस्थेत, संगीताची मूलभूत तत्वे व संस्कृती याचा पुरस्कार केला जातो. ७ ते ७० वयोगटासाठी, आखलेल्या विविध अभ्यासक्रमाअंतर्गत आजवरच्या वाटचालीत ८०० हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आजवर बऱ्याच विद्यार्थ्यांची व श्रोतृवर्गाची विश्वासार्हता, निष्ठा व प्रेम आम्ही संपादित केले आहे.

आताच सुरू केलेल्या ऑनलाईन वर्गात नोंदणी करायची असल्यास नोंदणीचा अर्ज भरा.

वैयक्तिक लक्ष देण्याच्या उद्देशाने, एका वर्गात जास्तीत जास्त ५ विद्यार्थ्यांचा समावेश असतो.

चला अभ्यास करू

संगीत शिकण्याचे बरेच फायदे आहेत - मग ते तुमचा आत्मविश्वास वाढवणारे असोत, तुमची स्मरणशक्ती वाढवत असोत किंवा तुमचे सामाजिक वर्तुळ रुंदावत असोत.

आपण संगीत शिकायला हवे कारण

मोफत पाठासाठी वेळ ठरवा

आमची तत्त्व

ध्येय

व्यावसायिकरणाकडे भर न देता शास्त्रीय संगीताचा वारसा जपणे व उत्तम कलाविष्कारासाठी झटणे.

उद्दिष्ट

विद्यार्थ्यांच्या अंगीभूत कलेचा विचार करून त्यानुसार प्रशिक्षण देऊन कलाकार व उत्तम श्रोता घडविणे.

आताच वर्गात सहभागी व्हा व सूरांचे साधक बना

प्रशस्तिपत्र

आमचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक म्हणतात

हेमांगी मॅमका बच्चों से रिश्ता एक फ्रेंड की तरह है। जितना सिरियसली हम गाना सिखते है उतना ही मस्ती मजाक भी करते है। शास्त्रीय संगीत से जितना डर था, वह यहा आके पूरा खतम हुआ है
सुगंधा कौशिक
विद्यार्थी
ज्या वेळेला एखादा राग शिकवला जातो, त्यावेळी तो फक्त त्या रागापुरता मर्यादित नसतो त्याच्या आजुबाजूचे सारे राग त्यापेक्षा कसे वेगळे आहेत हे समजावून रागाचे चलन व स्वरूप शिकवले जाते. वर्कीग स्टूडेन्ट्स चे कौतुक करून त्यांच्यासाठीही वेळा ऍडजस्ट करायला मॅडम नेहमी तयार असतात. सर्वांनी क्लासिकल म्यूझिक शिकावे व पुढे न्यावे हिच त्यांची कळकळ असते.
माला खारकर
विद्यार्थी
माझी मुलगी इरा ही साडेचार वर्षांपासून सूर संस्कार मध्ये शास्त्रीय संगीत शिकत आहे. तिला संगीताची खूपच आवड निर्माण झाली आहे. आता शाळेतही गाण्यासाठी तिला निवडतात. हेमांगी मॅडम, मुलांच्या कलेने घेतात व त्यांच्या लाडक्या होतात आता मुल क्लास बुडवायचा नाही. म्हनून हट्ट करतात.


शिल्पा परांजपे - खातू
पालक
जब तक आपका सूर ठीक नही लगता, तब तक She will never allow you to sing further आपके सूर पक्के होने के बादही आपको आगे सिखाया जाता है। हमें एक राग में बस एक ही नही, अनेक रसपूर्ण बंदिश सिखायी जाती है
प्राजक्ता कुलकर्णी
विद्यार्थी
गेली चार वर्षे सई सूर संस्कारमध्ये शिकत आहे. तिला संगीताची खूपच आवड निर्माण झाली आहे. तिला आता पेटीही शिकायची आहे, इतक संगीत आवडतय.



गीत कुंभार
विद्यार्थी
माझ्या वयाच्या चाळिशीमध्ये मी भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्याचा विचार केला ,मन साशंक होते.क्लास सुरू केला पण विशारद करण्याच स्वप्न मात्र हेमांगी मॅडम सारख्या प्रेमळ गुरू लाभल्या म्हणून पाहू शकले . गेली पाच वर्षे मी यशस्वी रित्या शिकत आहे याच सार श्रेय त्यांनाच.हेमांगी मॅडम व शीतल सरांनी प्रेमाने जोपासलेल्या सूर संस्कार नावाच्या गुरुकुलात शिकण्याची संधी मला लाभली , म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.
सौ. मानसी काशीकर
विद्यार्थी

सौ. हेमांगी पाकणीकर यांची दूरदर्शन केरळ वाहिनीवरील मुलाखत